1) मनोरंजक उखाणे

Hi friends,.......

मी तुमचा मित्र ,तुमच्या साठी नविन नविन उखाणे सादर करीत आहो; तुम्हाला तर माहितच आहे की  आपल्या भारताच्या संस्क्रुति मध्ये ,लग्ना मध्ये,मकर संक्रांत मध्ये वान वाटतात तेव्हा स्त्रीया उखाणे घे म्हणतात..........म्हणुन मी तुमच्यासाठी नविन नविन उखाणे आणले आहेत

1) मंदिरात वाहाते ,फूल आणि पान,
    .........रावांचे नाव घेते,ठेऊन सर्वांचा मान.

2) छन छन बांगड्या, छुम् छुम् पैंजन,
.........रावांचे नाव घेते,ऐका सारे जण.

3) माहेर तस सासर,नाते सबंधही जूने,
......राव आहे सोबत ,मग मला कशाचे उणे.

4) कपाळाच् कुंकु,जसा चांदन्याचा ठसा,
......रावांचे नावाचा,भरला हिरवा चूड़ा.

5) कपाळावर कुंकु,हिरवा चूड़ा हाती,
......राव माझे पति,सांगा माझे भाग्य किती

6) मोह नाही ,माया नाही,नाही मत्सर हेवा,
.....रावांचे नाव घेते नीट लक्ष्य ठेवा

7) अंगनात वृंदावन, वृन्दावनात् तुळस,
.......रावांच् नाव घेतांना,कसला आला आळस

8) लावीत होते कुंकु, त्यात पडला मोती,
......रावा सारखे मिळाले पति, भाग्य मानु किती.

9) ताजमहल बांधायला,कारागीर होते कुशल,
.......रावांचे नाव घेते ,तुमच्यासाठी स्पेशल.

10) शंकराची पूजा पार्वती करते खाली वाकुन,
....रावांचे नाव घेते, सर्वांचा मान राखून.

11) श्री विष्णूच्या मस्तकावर् सदैव असतो शेष ,
.....रावांचे नाव घेउन करते गृह प्रवेश.

12) पुजेच्या साहित्यात, उद्बत्तीचा पुडा,
....रावांच्या नावाने, भरला सौभाग्याचा चूड़ा

13) संसार रूपी वेलीचा,गगनात गेला झुला,
......रावांचे नाव घेते,आशीर्वाद द्यावा मला.

14) सवित्रीने नवस केला-पति मिळावा सत्यवान,
.....रावांच्या जीवावर मी आहे भाग्यवान.

15) अभिमान नाही संपत्तीचा, सर्व नाही रूपाचा,
......रावाणा घास घालते वरण-भात-तुपाचा.

16) खड़ी साखरेचि गोडी अन् फुलाचा सुगंध,
....रावांच्या संसारात,स्वर्गाचा आनंद.

17) सनई आणि चौघड़ा, वाजे सप्त सुरात,
.....रावांचे नाव घेते,....च्या घरात.

18) राज हंस पक्षी शोभा देतो वनाला,
.......रावांचे नाव घेते, आनंद माझ्या मनाला.

19) श्रीकृष्णाने पण केला, रुक्मिनिलाच वरीन,
.......रावांच्या जीवनात आदर्श संसार करीन.

20) जन्म दिला मातेने,पालन केले पित्याने,
......रावांचे नाव घेते, पत्नी या नात्याने.

21) वय झाले लग्नाचे लागली प्रेमाची चाहूल,
.......रावांचे जीवनात टाकले मी पाऊल.

22) पोर्णिमेचा चंद्र आकाशात दिसतो साजरा,
......रावानी आणला मला मोग्र्याचा गजरा.

23) चाँदीचे जोडवे पतीची खून,
.....रावांचे नाव घेते,.......ची सुन.

24) धरला यांनी हात,वाटली मला भीती,
.....हळूच म्हणाले....राव अशीच असते प्रिति.

25) दारी होता टेबल ,त्यावर होता फ़ोन,
....रावानी पिक्चर दाखवला हम आपके है।कौन?

26) लग्नासारख्या गोड दिनी आज्ञा कशी मोडू
.....रावांना घास देताना,मला येई गोड हसू .

27) शुभमंगल प्रसंगी अक्षदा पडतात माथी
.......राव म्हाजे माझ्या जीवनसाथी .

28) चंद्राच्या महालात रोहिणीची चाहूल,
.......रावांच्या जीवनात टाकते मंगलमई पाऊल.

29) आकाशाच्या अंगणात ,ब्रह्मा ,विष्णू आणि महेश,
…..रावांचे नाव घेऊन करते हो गृहप्रवेश .

            गमतीदार उखाणे

30) गर्द आमराई त्यामाध्ये पोपटाचे थवे,
….चे नाव माझ्या ओठी यावे .

31) ५+४=एक़ुअल तु नाइन,
….इज माइन.

32) गोव्यावरून आणले काजू ,
..रावांच्या थोबाडीत द्यायला मी का लाजू .

33) वड्यात वडा बटाटावडा, ….मारला खडा
म्हणून जमला आमचा जोडा .

34) सुंदर सुंदर हरिणाचे इवले इवले पाय ,
आमचे हे अजून कसे नाही आले .
गटारात पडले कि काय .

35) डाळीत डाळ तुरीची डाळ ,
हिच्या मांडीवर खेल्विन एका वर्षात बाळ .

36) निळे निळे डोंगर आणि हिरवे हिरवे रान ,
…रावांचा आवडता छन्द म्हणजे सतत मदिरापान .

37) एक होती चिऊ एक होती काऊ ,
..रावांचे नाम घेते काय काय खाऊ .

38) शिडीवर शिडी बत्तीस शिडी ,
…राव ओढतात विडी अन मी लावते काडी .

39) तेलाच्या दिव्याला तुपाची वात ,
..रावांशी केले लग्न ,आता आयुष्याची वाट .

40) विडाच्या पानात पावशेर कात ,
…रावांच्या कमरेत घातली गाढवाने लात .

41) चांदीच्या ताटात ठेवले होते गहू ,
लग्न झालेच नाही तर नाव कशे घेऊ .

42) साठ्यांची बिस्किटे ,बेदेकारंचा मसाला,
…नाव घ्यायला आग्रह कशाला .

43) हाताने कराव काम मुखाने म्हणावे राम ,
रावांचे चरण हेच माझे चारधाम .

44)आला आला रुकवत त्यावर चहाची किटली ,
नवरा नवरी सिनेमा बघायला बसली तर मध्येच फिलिंम तुटली . 









Previous
Next Post »

1 comments:

Click here for comments
18 August 2020 at 06:14 ×

For more interesting ukhane, check this -

ukhane101

marathi ukhane for groom

marathi ukhane for male

marathi ukhane for female

marathi ukhane for bride

Congrats bro Pandit Radhe Krishna you got PERTAMAX...! hehehehe...
Reply
avatar